मार्च महीन्यातील मार्गदर्शन संत्रा पीकमार्च महीन्यातील मार्गदर्शन संत्रा पीक


 मार्च महीन्यातील मार्गदर्शन संत्रा पीक


संत्रा पीक या महिन्यात तापमान वाढीमुळे 7-10 दिवसांनी दुहेरी आळे पध्दतीचा अवलंब करून बगीच्याला ओलीत करावे.अन्यथा  1-4 ,5-7 ,आणि 8वर्षावरील झाडाना  12-53,78-127 आणि145-180लिटर पाणी ठिंबक सिचनाने द्यावे

 

सिल्ला आणि पाने पोखरणाऱ्या अळीच्या प्रार्दुभाव नियंत्रणाकरिता 1.5 मिली डायमिथोएट किंवा 0.5 मिली इमिडाक्लोप्रीड किंवा 2 मिली क्वीनॉंलफॉंस किंवा 0.3 ग्रॅ. थायमिथोक्झेम 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याची 15 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.

लेमन बटरफ्लायचा प्रादुर्भाव असल्यास 2 मिली क्वीनॉंलफॉंस किंवा 1 मिली फेनवलरेट 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याची 15 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.


• अंबीया बहाराची फळगळ थांबविण्यासाठी 2-4-डी 1.5 ग्रॅ आणि 1 किलो युरीया 100 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


• तापमानात अचानक वाढ (35-400 डीग्री से.) झाल्यास 2,4-डी 1.5 ग्रॅ. + 1 किलो पोटॅशिअम नायट्रेट 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ